रत्नागिरी : रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’ने रविवार, १ जून २०२५ रोजी उम्रज, कराड येथे झालेल्या जिजामाता विभागीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत, एकूण ८३ पदके (४४ सुवर्ण, ३३ रौप्य, ६ कांस्य) आणि १० वैयक्तिक चॅम्पियनशिप सह ‘जनरल ग्रुप चॅम्पियनशिप’ची मानाची ट्रॉफी पटकावली आहे. ग्रुपमधील ३० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपले जलकौशल्य सिद्ध केले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रशिक्षक श्री. महेश शंकरराव मिलके सर यांच्या कठोर परिश्रमाचे आणि मोलाच्या मार्गदर्शनाचे हे यश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली.
पदक विजेत्या खेळाडूंची नावे:
मास्टर्स गट पुरुष:
विशाल कुबल: ३ सुवर्ण, १ रौप्य
दीपक पटणी: १ रौप्य
मास्टर्स गट महिला:
गौरी मिलके: ४ सुवर्ण
युविका पटणी: १ रौप्य, १ कांस्य
ओपन गट मुले:
करण महेश मिलके: ४ सुवर्ण, वैयक्तिक चॅम्पियनशिप
ओपन गट मुली:
तनया महेश मिलके: ४ सुवर्ण, वैयक्तिक चॅम्पियनशिप
दिपाली पवार: १ कांस्य
संस्कृती जाधव: ३ रौप्य
१६ वर्षांखालील मुले:
आयुष काळे: ३ सुवर्ण, १ रौप्य, वैयक्तिक चॅम्पियनशिप
श्रेयश विलणकर: १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य
१६ वर्षांखालील मुली:
आरोही पिलणकर: ४ सुवर्ण, वैयक्तिक चॅम्पियनशिप
स्वरांगी मयेकर: ४ रौप्य, वैयक्तिक चॅम्पियनशिप
१४ वर्षांखालील मुले:
रुद्र दरेकर: ३ सुवर्ण, १ रौप्य, वैयक्तिक चॅम्पियनशिप
हर्षल सावंत: १ रौप्य, २ कांस्य
आयुष काताळे: २ रौप्य, २ कांस्य
१४ वर्षांखालील मुली:
निधी भिडे: ४ सुवर्ण, वैयक्तिक चॅम्पियनशिप
अदिती माने: ४ रौप्य
१२ वर्षांखालील मुले:
शौर्य राऊत: १ रौप्य
१२ वर्षांखालील मुली:
कस्तुरी साबळे: ४ रौप्य
१० वर्षांखालील मुले:
रुद्र सरफरे: २ सुवर्ण, २ रौप्य, वैयक्तिक चॅम्पियनशिप
अर्णव पिलणकर: ४ कांस्य
८ वर्षांखालील मुले:
रिद्धेश हरचकर: ३ सुवर्ण, १ रौप्य, वैयक्तिक चॅम्पियनशिप
६ वर्षांखालील मुले:
अधीश जाधव: ३ सुवर्ण, १ रौप्य, वैयक्तिक चॅम्पियनशिप
६ वर्षांखालील मुली:
अर्ना देवळेकर: ४ रौप्य
जिनिषा पटणी: १ रौप्य, १ कांस्य
विशेष दिव्यांग मुलांचा गट:
ओपन गट: श्रीपाद मयेकर (३ सुवर्ण)
१२ वर्षांखालील: मल्हार सुतवणे (३ सुवर्ण)
याशिवाय, सिद्धार्थ सूर्यगंध, शरयू पाटणे आणि श्लोक राणे यांनीही स्पर्धेत उत्तम कामगिरी केली.
महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या या दणदणीत यशाबद्दल सर्व स्तरांवरून त्यांचे कौतुक होत असून, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 02-06-2025














