राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमीमध्ये (NDA & NA) अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! ४०६ जागांसाठी भरती जाहीर.

देशाची सेवा करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) आणि नौदल अकॅडमी (NA) मध्ये अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ‘NDA & NA परीक्षा (II) २०२५’ अंतर्गत एकूण ४०६ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी १७ जून २०२५ पर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

जाहिरात क्रमांक: १०/२०२५-NDA-II.

एकूण रिक्त पदे: ४०६

पदांचा तपशील:

  • नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA):
    • लष्कर (Army): २०८ पदे
    • नौदल (Navy): ४२ पदे
    • हवाई दल (Air Force): १२० पदे
  • नौदल अकॅडमी (१०+२ कॅडेट एंट्री स्कीम): ३६ पदे

शैक्षणिक पात्रता:

  • लष्कर (Army) पदांसाठी: १२ वी उत्तीर्ण.
  • नौदल (Navy), हवाई दल (Air Force) आणि नौदल अकॅडमी (१०+२ कॅडेट एंट्री स्कीम) पदांसाठी: फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयासह १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: उमेदवाराचा जन्म ०१ जानेवारी २००७ ते ०१ जानेवारी २०१० या दरम्यान झालेला असावा.

अर्ज शुल्क:

  • खुला/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी : १०० रुपये
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी : कोणतेही शुल्क नाही.

नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा बजावावी लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जून २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

महत्त्वाची संकेतस्थळे :

महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशाच्या गौरवशाली संरक्षण दलात सामील होण्याची ही एक उत्तम संधी आहे.