महावितरणमध्ये २४९ शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती : यवतमाळ येथे नोकरीची संधी!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MAHADISCOM – महावितरण) ने apprenticeship साठी एकूण २४९ पदांची भरती जाहीर केली आहे. इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COPA (Computer Operator & Programming Assistant) या ट्रेडमधील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २ जून ते १० जून २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भरतीचा तपशील:

  • संस्थेचे नाव: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MAHADISCOM)
  • पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (Apprentice)
  • रिक्त जागांची संख्या: २४९
  • नोकरीचे ठिकाण: यवतमाळ, महाराष्ट्र
  • अधिकृत वेबसाइट: mahadiscom.in

पदांनुसार तपशील आणि पात्रता:

  • इलेक्ट्रिशियन (Electrician): ११० पदे
    • शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT), नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि COPA या स्वतंत्र ट्रेडमध्ये उत्तीर्ण असावा.
    • वेतन: नियमांनुसार
    • वयोमर्यादा: १८ ते २७ वर्षे
  • वायरमन (Wireman): १०९ पदे

  • COPA (Computer Operator & Programming Assistant): ३० पदे
    • शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT), नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि COPA या स्वतंत्र ट्रेडमध्ये उत्तीर्ण असावा.
    • वेतन: नियमांनुसार
    • वयोमर्यादा: १८ ते २७ वर्षे

वयोमर्यादेत सूट:

  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर (Merit) केली जाईल.

अर्ज कसा करावा: इच्छुक आणि पात्र उमेदवार २ जून ते १० जून २०२५ या कालावधीत mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा:

  • अधिसूचना जारी झाल्याची तारीख: २ जून २०२५
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० जून २०२५
  • कागदपत्र पडताळणीची तारीख: २१ ते २३ जून २०२५

महत्त्वाच्या लिंक्स:

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.