कोल्हापूर: बँक ऑफ इंडिया (BOI), कोल्हापूर झोनने ‘ऑफिस अटेंडंट’ या पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ जून २०२५ आहे.
पदाचे नाव: ऑफिस अटेंडंट
पदसंख्या: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणे अनिवार्य आहे. (मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.)
वेतनश्रेणी: निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना रु. 14,000/- वेतन मिळेल.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज पद्धती: या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: झोनल मॅनेजर, एफआई विभाग, बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, जयधवल बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर-४१६००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ जून २०२५
महत्वाचे मुद्दे:
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०३ जून २०२५ आहे. या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्जामध्ये कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (PDF) https://drive.google.com/file/d/1r2n6NuPunWnBtKYhRWp5PDQ6nvLZphjS/view काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी या लिंकवरील जाहिरात वाचावी.
- इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर वेळेत सादर करावा.
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. अधिक तपशिलांसाठी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला (https://bankofindia.co.in/) भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














