गुहागर : दाभोळवरून चिपळूणला विवाहासाठी जाणाऱ्या कुझर जीपला चिपळूण – गुहागर मार्गावरील देवघर ते मार्गताम्हाने दरम्यान अपघात झाला. या अपघातात आठजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्यात आले. हा अपघात सोमवारी सकाळी ९.३ वाजण्याच्या सुमारास घडला.
या घटनेतील कुझर जीप दाभोळमार्गे चिपळूणकडे लग्नासाठी निघाली होती. या गाडीत एकूण १५ जण होते. ही गाडी दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील असल्याचे समजते. देवघरदरम्यान आल्यावर या गाडीवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या एका बाजूला झाडांमध्ये घुसली. या गाडीतील १५ पैकी आठजण जखमी झाले.
या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीची चाकेही निखळली असून, ती झाडांमध्ये अडकल्याचे दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:51 AM 03/Jun/2025














