दापोली : तालुक्यातील हर्णेत तीन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे येथील मोबाईलचा संपर्क तुटला आहे.
हर्णे हे गाव मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. रोज लाखो रुपयांचा लिलाव येथील बंदरात होतो. मात्र मोबाईलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांना, व्यावसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हर्णे आणि परिसरात बीएसएनएल कंपनीची सेवा आहे.
जिल्ह्यातील या मोठ्या बंदराच्या ठिकाणी या सेवेचा पुरेपूर लाभ मिळत नसल्याने तीव्र संताप ग्राहक व्यक्त करत आहेत. बीएसएनएलची सेवा ठप्प होण्याची ही रोजची समस्या झाल्याने शासनाने ग्रामीण भागात इतर कंपनीची सेवा पुरवण्याची मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 03/Jun/2025














