दापोलीतून २०० टन आंबा कॅनिंगला

दापोली : मान्सूनपूर्व पावसाने आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दापोली तालुक्यामधून जवळपास २०० टन आंबा कॅनिंगसाठी गेला असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. यावर्षी हापूस कमी प्रमाणात असला तरी सुरुवातीला दरही चांगला होता, तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हाच हापूस उशिरा मार्केटमध्ये येतो.

मात्र मे महिन्यामध्ये काही ठिकाणी आंबा काढणी बाकी असताना अवकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार एन्ट्रीमुळे आंबा बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने आंबा कॅनिंगला विकावा लागला. यावर्षी प्रतिकिलो मागे ३५ रुपयांच्या दराने खरेदी सुरूवात झाली होती. हा दर ५० वर आला. मात्र पुन्हा पावसाने कॅनिंगचा दर घसरला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 03/Jun/2025