फळझाडे लागवडीसाठी १०० टक्के अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन

गुहागर : कृषी अधिकारी उत्तम प्रकारे जनजागृतीसाठी प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्यांना साथ देऊन आपण आपल्या ग्रा. पं. मार्फत प्रस्ताव करण्यासाठी कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी जरूर संपर्क साधावा आणि ओसाड पडीक जमिनींवर फळझाडे लावून फलोत्पादन करून कोकणाचे नंदनवन करावे, असे आवाहन उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी कोकणातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

शासनाच्या कृषी विभागाकडून मिळणाऱ्या १०० टक्के अनुदानातील आंबा, काजू, नारळ, सुपारी, आवळा, कोकम (रातांबा), जांभूळ इत्यादी फळझाडे तर खैर, साग, बांबू इत्यादी उत्पन्न देणारे वृक्ष लागवड करण्यासाठीसुद्धा अनुदान मिळते.

याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घेऊन आपापल्या ओसाड पडीक जमिनींवर फळझाडे लागवड करणे हिताचे आहे. सरपंच जनार्दन आंबेकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 PM 03/Jun/2025