रत्नागिरी : सत्तेत असलेल्या महायुतीमधील भाजप, शिवसेना पक्षाकडून सदस्य नोंदणीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेकडून ७० हजार सदस्य नोंदणी केली आहे. २० जूनपर्यंत १ लाख सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मागील महिन्यात घेतलेल्या आढाव्यात शिवसेना सदस्य नोंदणी समाधानकारक नसल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले होते; मात्र स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत त्यांनी शहरातील प्रभागनिहाय आणि ग्रामीण भागाचा पंचायत समिती गण आणि विभागनिहाय आढावा घेतला.
या वेळी माहिती शहरप्रमुख बिपिन बंदरकर आणि विभागप्रमुख व माजी नगरसेवकांकडून घेतली. शहर परिसरात सुमारे १४ हजारांहून अधिक सदस्य नोंदणी झाली आहे. काही विभागात साडेतीन हजारांहून अधिक सदस्य नोंदणीचे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागात जवळपास ५५ हजाराहून अधिक फॉर्म भरून झाले आहेत. मागील दीड-दोन महिन्यात शिवसेनेने ७० हजार फॉर्म भरून सदस्य नोंदणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 03/Jun/2025














