रत्नागिरी : जिल्ह्यातील शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या शिक्षकांची १२ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे अशा शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे व ज्या शिक्षकांची सेवेला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत व शासकीय नियमाने लाभार्थी आहेत अशांची निवड श्रेणीचे प्रशिक्षण रत्नागिरी येथे सुरू झाले आहे.

यामध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण २ ते १२ जून या कालावधीत होत आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेतर्फे (डाएट) हे प्रशिक्षण सुरू आहे. डाएटचे प्राचार्य प्राचार्य सुशील शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कला, क्रीडा अशा विविध गटांत सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 03/Jun/2025