रत्नागिरी : सर्प, विंचूदंशावरील औषधोपचार तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करण्याची मागणी

साडवली : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झाली असून, शेतीच्या कामांना वेग आला आहे. याच कालावधीत सर्पदंश आणि विंचूदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे गावविकास समितीच्या रत्नागिरी जिल्हा संघटनेने यावरील उपचार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

गावविकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्वच तालुका रुग्णालयांमध्ये सर्पदंश व विंचूदंशावरील औषधोपचार उपलब्ध करून ठेवावे.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या सुविधांचा नियमित आढावा घेण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 PM 03/Jun/2025