चिपळूण पंचायत समिती’वर कोसळली फांदी

चिपळूण : येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट समूह साधन केंद्र इमारतीवर झाडाची मोठी फांदी कोसळल्याने पडझड झाली आहे. यामध्ये शिक्षण विभागाचे नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाशेजारीच गट समूह साधन केंद्राची मोठी इमारत आहे. नुकत्याच कोसळलेल्या पावसात या इमारतीवर बाजूच्या पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी पडून त्यात इमारतीची पडझड झाली आहे.

या इमारतीतील तळमजल्यात विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक बसतात तर वरच्या मजल्यावर रेकॉर्ड आहे. पावसात झालेल्या पडझडीमुळे या इमारतीचे पत्रे फुटले, भिंत कोसळली आहे शिवाय इतर भिंतींनाही तडे गेले आहेत. याबरोबरच रेकॉर्डही भिजले आहे. शिक्षण विभागाने या नुकसानीचा पंचनामा केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 03/Jun/2025