संगमेश्वर : करजुवे खाडीत अवैध वाळू वाहतूक सुरु

संगमेश्वर : करजुवे खाडीतील वाळू उपशाला पावसामुळे काहीसा ब्रेक लागला होता; मात्र पावसाने उसंत घेताच वाळू भरलेल्या गाड्या राजरोसपणे धावत आहेत. सर्वसामान्य जनतेला वाळू भरून जाणाऱ्या गाड्या दिसत असताना महसूल विभागाला दिसत नाही का? असा यक्षप्रश्न खाडीभाग जनतेतून उपस्थित केला जात आहे.

वाळू उत्खनन व अवैध वाहतूक करण्याची कोणतीही परवानगी नसताना गेले काही महिने करजुवे खाडीपात्रात रात्रंदिवस संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करून मोठ्या वाहनातून चढ्या दराने जिल्ह्याच्या विविध भागासह परजिल्ह्यातही त्याची राजरोसपणे वाहतूक केली जात होती. पावसामुळे याला ब्रेक लागला होता; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वाळू भरलेल्या गाड्या करजुवे, डिंगणी शास्त्रीपूलमार्गे तसेच डिंगणी-फुणगूस पुलावरून जाकादेवीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरून धावत आहेत. असा आरोप नागरिकांतून होत आहे. यावर प्रशासनाकडून तातडीने कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 03/Jun/2025