संगमेश्वरमधील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील विविध खात्यांतील तीन अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश काढले असून, त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे.

गेले साडेतीन वर्षे काम केलेले देवरूख नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक चेतन विसपुते यांची नाशिक विभागात बदली झाली आहे. विसपुते यांनी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या जागी अजून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. वनविभागातील तालुका वनाधिकारी म्हणून चार वर्षे काम पाहिलेले तौफिक मुल्ला यांची प्रशासकीय बदली मंडणगड येथे झाली आहे. गटविकास अधिकारी भरत चौगले यांची कोल्हापूर येथे बदली केली आहे. या तीनही अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 03-06-2025