चिपळूण : तालुक्यातील कोंडमळा-कामथे सीमेजवळील भैरी मंदिर येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. पोलिस त्यासंदर्भात अधिक माहिती घेत आहेत. ही घटना ३१ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजता उघडकीस आली.
कोंडमळा कामथे सीमेजवळ एक पुरुष पडलेला असल्याचे एका रिक्षा चालकाला दिसले. त्याने त्या व्यक्तीला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची काहीच हालचाल झाली नाही. त्यानंतर संबंधित रिक्षा चालकाने ग्रामस्थांना याबाबतची कल्पना दिली व त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही त्याला ओळखत नव्हते. सदर व्यक्ती फिरस्ता असल्याचे बोलले जात आहे. वयोवृद्ध व अशक्त असल्याने त्याचा तेथे मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 03/Jun/2025














