आवाशी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथून मुंबईकडे जाणारा बारा चाकी टँकर रस्त्याच्या कडेला उभा करण्याच्या प्रयत्नात कलंडला. ही घटना सोमवार, २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता आवाशी (खेड) येथे घडली.
आशिष पाटील (मुंबई) हा जयगड येथून टँकर (एमएच ०४ के ८२२४) घेऊन मुंबईकडे जात होता. टँकरमध्ये राख भरलेली होती. आवाशी येथे महामार्गावर पुढील चाक पंक्चर झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा करण्याच्या प्रयत्नात अंदाज न आल्याने उलटला. सुदैवाने चालकाला इजा झाली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 03/Jun/2025














