संगमेश्वर : संगमेश्वर पोलीस ठाण्यात सामाजिक सलोखा समितीची स्थापना करण्यात आली. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सलोखा समितीमध्ये सर्वधर्मीय प्रतिष्ठित व्यक्ती तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे.
या समितीच्या माध्यमातून महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असे बैठकीत नमूद करण्यात आले. यासाठी समिती सदस्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असेही अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीत आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने विशेष चर्चा करण्यात आली. गोवंश हत्या आणि गोमांस वाहतुकीसंदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यावर भर देण्यात आला. सामाजिक सलोखा समिती सर्वसमावेशक असून, या समितीच्या वतीने सर्वधर्मीय सण आनंदात आणि शांततेत साजरे होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 03/Jun/2025














