राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रत्नागिरीत गुणगौरव सोहळा आणि निबंध स्पर्धा बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

रत्नागिरी, ०३ जून २०२५ : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी तालुका दक्षिण यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा टेम्बे येथील श्री स्वामी समर्थ हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात पंचक्रोशीतील उमरे माध्यमिक विद्यालय, कुरतडे येथील आदर्श हायस्कूल आणि टेम्बे हायस्कूल या तीनही प्रशालांमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांबरोबरच, या तीनही प्रशालांच्या मुख्याध्यापकांचाही त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष दादा दळी, सरचिटणीस सुशांत पाटकर, उपाध्यक्ष राजेश पाथरे, ॲड. अवधूत कळंबटे, कामगार आघाडीचे संतोष बोरकर, कोषाध्यक्ष महेश गांगण, शेट्ये सर, जाधव सर, चव्हाण मॅडम, माजी सरपंच टिके गुरुदास गोविलकर, संदीप पवार, ऋग्वेद दळी, प्रसाद बेर्डे, ओंकार दळी, हेमंत मलुष्ट्ये, सुयोग खाके आदींसह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनामागे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आणि विचारांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, तसेच त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश होता. या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:18 03-06-2025