IPL 2025: आयपीएल Final वर पावसाचे संकट, अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात

यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये खेळविला जात आहे. मैदानावर काळे ढग दाटले असून अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे सामन्यावर पावसाचे संकट घोंघावू लागले आहे.

आयपीएल २०२५ फायनल गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळविली जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्समध्ये ही लढत होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ही फायनल पाहण्यासाठी सुमारे १ लाख प्रेक्षक असणार आहेत. तर हॉटस्टारवर करोडो लोक हा सामना पाहणार आहेत. तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल अहमदाबादला पोहोचले आहेत.

सर्व क्रिकेट चाहत्यांच्या आशा या आता पावसावर अवलंबून आहेत. अहमदाबादला विमानाने जाण्यासाठी बऱ्याच लोकांनी चौपट दराने तिकिटे खरेदी केली आहेत. तसेच या फायनलच्या तिकीटासाठीदेखील हजारो रुपये मोजले आहेत. अशातच पाऊस या क्रिकेट प्रेमींच्या आनंदावर विरजण घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे या स्टेडिअमची अशी रचना आहे की किती जरी पाऊस पडला तरी त्याचे पाणी अर्ध्या तासात ड्रेनेज लाईनमधून वाहून जाते. यामुळे मैदान ओले राहत नाही. मैदानाच्या खाली ही अत्याधुनिक ड्रेनेज यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेचा फायदा आजच्या सामन्यात होतो का हे पाहणे गरजेचे आहे.

आरसीबीला दिलासा…
आरसीबीचा एक खेळाडू पुत्ररत्न झाल्याने इंग्लंडला गेला होता. फिल साल्ट हा सोमवारच्या सरावाला उपस्थित नव्हता. यामुळे तो मायदेशी गेल्याने फायनलला नसणार असे गृहीत धरले जात होते. परंतू, साल्ट हा दुपारीच खासगी विमानाने अहमदाबादला पोहोचला आहे. यामुळे बंगळुरूला मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 03-06-2025