रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील गावठी हातभट्टीवर छापा टाकत शहर पोलिसांनी तब्बल ४२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवार ३ जून रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
महेश मधुकर पाटील (रा. पाटीलवाडी मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी या धाडीत ९४० लिटर रसायन जागेवर नष्ट केले. तसेच ८० लिटर गावठी हातभट्टीची दारु व इतर साहित्य असा एकूण ४२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 04/Jun/2025














