मेष
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी लाभेल.
वृषभ
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सही करताना काळजी घ्यावी लागेल.
मिथुन
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुखा – समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपार नंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल.
कर्क
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपार नंतर सहलीचा बेत ठरवू शकाल.
सिंह
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.
कन्या
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल.
तूळ
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील.
वृश्चिक
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील.
धनु
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. कार्य सफल होईल.
मकर
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा.
कुंभ
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचे राहील.
मीन
आज चंद्र 04 जून, 2025 बुधवारी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 04-06-2025














