रत्नागिरी : नायशी ग्रामपंचायत कार्यालयात ५ जून रोजी कृषी मार्गदर्शन मेळावा

रत्नागिरी : कृषी दिनानिमित्त व जागतिक पर्यावरण दिननिमित्त चिपळूण तालुक्यातील नायशी ग्रामपंचायत कार्यालयात ५ जून रोजी कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभाग आणि नायशी ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ११ वाजता कृषी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कृषी मार्गदर्शन मेळाव्याला जास्तीत शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नायशी ग्रामपंचायत सरपंच संदीप घाग यांनी केले आहे.

चिपळूण तालुका कृषी विभागाचे कृषी सहायक आकाश चव्हाण, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रीय कर्मचारी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी तलाठी सजा कोकरेचे अधिकारी, नायशी ग्रामसेवक सोनवणे आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी मेळाव्याला कृषी विभागाच्या भात लागवडीच्या विविध पद्धती, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड १००% अनुदानावर आधारित योजना, आदी योजनेवर मार्गदर्शन करणार आहेत. गावातील शेतकरी ग्रामस्थांनी याचा लाभघ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत नायशी सरपंच घाग यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 04/Jun/2025