IPL 2025 Awards Winners And Prize Money Full List :आयपीएलच्या १८ व्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाब किंग्जला पराभूत करत पहिली वहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली.
यंदाच्या हंगामात फायनल खेळणाऱ्या आरसीबी संघाकडून विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत (१५ सामन्यात ६५७ धावा) आणि जोस हेजलवूड पर्पल कॅपच्या शर्यतीत (१२ सामन्यात २२ विकेट्स) तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याचे पाहायला मिळाले.
ऑरेंज अन् पर्पल कॅप गुजरातच्या ताफ्यातील खेळाडूला, सूर्यालाही मिळाला मोठा पुरस्कार
उप विजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या पंजाब किंग्ज कर्णधारही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आघाडीवर होता. पण शेवटच्या सामन्यात तो मोठी धावसंख्या करू शकला नाही. परिणामी १७ सामन्यातील ६०४ धावांसह तो सहाव्या स्थानावर राहिला. एलिमिनेटरमध्ये आउट झालेल्या गुजरातच्या ताफ्यातील साई सुदर्शन याने १५ सामन्यातील ७६९ धावांसह ऑरेंज कॅप पटकावली. दुसरीकडे याच संघातील प्रसिद्ध कृष्णान १५ सामन्यात २५ विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत बाजी मारली. सातत्यपूर्ण कामगिरीसह सर्वाधिक वेळा २५ पेक्षा अधिक धावा करणाऱ्या सूर्याची ऑरेंज कॅपची संधी हुकली. पण त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला. इथं एक नजर टाकुयात यंदाच्या हंगामातील ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांसह अन्य पुरस्कार मिळवणारे खेळाडू अन् त्यांना किती बक्षीस मिळाले यासंदर्भातील सविस्तर माहिती
आयपीएल २०२५ हंगामातील पुरस्कार अन् विजेता संघ
- IPL २०२५ विजेता – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२० कोटी)
- IPL २०२५ उपविजेता – पंजाब किंग्स (१२.५० कोटी)
- आयपीएल २०२५ हंगामातील फेअर प्ले – चेन्नई सुपर किंग्ज – १० लाख
ऑरेंज कॅप पर्पल कॅप विजेता
- ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) – साई सुदर्शन (GT) – १० लाख
- पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) – प्रसिद्ध कृष्णा (GT) – १० लाख
अन्य पुरस्कार
- IPL २०२५ हंगामातील उदयोन्मुख खेळाडू – साई सुदर्शन (GT) – १० लाख
- IPL २०२५ हंगामातील सुपर स्ट्रायकर – वैभव सुर्यवंशी (RR) – कार
- IPL २०२५ हंगामातील फँटसी प्लेअर – साई सुदर्शन (GT) – १० लाख
- IPL २०२५ हंगामातील मालिकावीर – सूर्यकुमार यादव (MI) – १० लाख
- IPL २०२५ हंगामातील सर्वाधिक चौकार – साई सुदर्शन (GT) – १० लाख
- IPL २०२५ हंगामातील सर्वाधिक षटकार – निकोलस पूरन (LSG) – १० लाख
- IPL २०२५ हंगामातील सर्वोत्तम झेल – कामिंडू मेंडिस (SRH) – १० लाख
- IPL २०२५ हंगामातील सर्वाधिक डॉट बॉल – मोहम्मद सिराज (गुजरात टायटन्स) – १० लाख
आयपीएल २०२५ स्पर्धेच्या फायनलमधील पुरस्कार अन् विजेत्या खेळाडूंची यादी
- सामनावीर – क्रुणाल पांड्या (RCB) – ५ लाख
- सुपर स्ट्रायकर – जितेश शर्मा (RCB) – १ लाख
- सर्वाधिक चौकार – प्रियंश आर्या (PBSK) – १ लाख
- सर्वाधिक षटकार – शशांक सिंग (PBKS) – १ लाख
- IPL फायनल फँटसी प्लेअर – शशांक सिंग (PBKS) १ लाख
- सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज – क्रणाल पांड्या (RCB)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 04-06-2025














