रत्नागिरी : सध्या परतीचा पाऊस सुरू असून, राज्यासह जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटात पावासाच्या जोरदार सरी बरसत आहेत. काही ठिकाणी बादळी घारेही वाहत आहेत. भातशेती तयार झाली असली तरी पावसामुळे भातकापणीची कामे खोळंबली आहेत.
अरबी सागरात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्याची स्थिती प्रभावी ठरणार असल्याने कोकण किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार मंगळवार सायंकाळपासून विजांच्या गडगडाटात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळीही काही भगात हलका पाऊस झाला.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. असे हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह सिंयुदर्ग जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात २०.७३ मि.मी.च्या सरासरीने १८६.५४ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली.
गत रविवारी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यानंतरही पावसाच्या सातत्याने आता खरीप हंगामातील कापणीचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 12/Oct/2024