रत्नागिरीत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

रत्नागिरी : सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस् एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीद्वारा २०२५-२६ या वर्षासाठी ६४ वी आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल सबज्युनिअर व ज्युनिअर गटासाठीची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १५ वर्षांखालील मुले (सबज्युनिअर) व १७ वर्षांखालील मुले व मुली (ज्युनिअर) या वयोगटात होईल.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 04/Jun/2025