रत्नागिरीचे बसस्थानक ‘नंबर वन’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरीचे नवे बसस्थानक हे राज्यात ‘नंबर वन’ आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा बसस्थानकाची उभारणी केली आहे, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथे उभारलेल्या नव्या बसस्थानकाची एकनाथ शिंदे प्रशंसा केली आहे.

रत्नागिरी येथील एसटी स्टँडसमोर पावसाळ्यात खड्डे पडलेले असतात. कित्येक प्रवाशांच्या अंगावर यामुळे चिखल उडतो. ही परिस्थिती बदलावी यासाठी परिवहन मंत्र्यांना आदेश दिले आहेत. राज्यातील सर्वच एसटी बसस्थानकात चांगल्या सोयीसुविधा व्हाव्यात म्हणून पुरेरसा निधी दिलेला आहे. चालक, वाहक, प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे.

उपहारगृह, चांगले पाणी, स्वच्छता यासह विविध सुविधा दिल्या पाहिजे. एसटीचा लूक बदलला पाहिजे. यासाठी काम सुरू आहे. येत्या काळात राज्यातील एसटी स्टॅन्डचे रूपडे पालटणार आहे. येत्या काळात कोकणात पर्यटन वाढेल. त्याचा फायदा एसटीला होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात विकास केला असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 04/Jun/2025