गुहागर : गुहागर तालुक्यातील पिंपर गावचा सुपुत्र शुभम सुनिल रहाटे याची प्रो लीगमधील कबड्डी बंगळुरू बुल्स संघात निवड झाली आहे. स्थानिक पातळीवरील श्री विठ्ठलाईदेवी क्रीडा मंडळ अडूर व व्यावसायिक स्तरावर विजय क्लब मुंबई या संघांचे प्रतिनिधित्व करताना दाखवलेल्या उत्कृष्ट खेळामुळे त्याला ही सुवर्णसंधी प्राप्त झाली.
गुहागर तालुक्यातील पहिला खेळाडू शुभमच्या रूपाने प्रो कबड्डीमध्ये दाखल झाल्याने तालुक्यातील कबड्डीपटूंमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. शुभमच्या या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 04/Jun/2025














