खेड : मंगिनापुडी बीच, मचलीपटनम, आंध्र प्रदेश येथे दि. ५ ते ८ जून या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय बारावी वरिष्ठ गट महिला बीच कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाच्या कर्णधारपदी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील समरीन बुरोंडकर हिची निवड झाली आहे. ही संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातील महिला क्रीडापटूंना प्रेरणा देणारी बाब ठरली आहे.
समरीन बुरोंडकर ही आघाडीची खेळाडू असून, तिच्या दमदार कामगिरीची दखल घेत तिला राज्याच्या महिला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र महिला संघाचे सराव शिबिर सध्या अलिबाग येथे सुरू आहे.
समरीनच्या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, उद्योगमंत्री उदय सामंत, कार्याध्यक्ष बाबु तांबे, उपाध्यक्ष सतीश चिकणे, मंगेश मोरे, उमेश सकपाळ, संतोष दामूस्टे, नेत्रा राजशिर्के, सचिव नितीन बांद्रे, खजिनदार अभिजीत सप्रे आदींनी तिचे कौतूक केले आहे.
खेड तालुका कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष महेश भोसले, उपाध्यक्ष भाई हंबीर, सचिव रवींद्र बैंकर, सहसचिव शरद भोसले, तसेच कबड्डी पंच व प्रशिक्षक विलास बेंद्रे आणि अनिकेत स्पोर्ट्स क्लबतर्फे समरीनचे कौतूक करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 04/Jun/2025














