गवतनाशक औषध प्राशन केल्याने रत्नागिरीत महिलेचा मृत्यू

रत्नागिरी, दि. ०४ जून २०२५: गवत मारण्याचे औषध (गवतनाशक) प्राशन केल्याने रत्नागिरी तालुक्यातील आगवे, मालपवाडी येथील एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ३ जून २०२५ रोजी दुपारी १:१५ वाजता रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

काय घडलं?

कल्याणी केशव मालप (वय ४५ वर्षे, रा. आगवे, मालपवाडी, पो. तरवळ, जाकादेवी, ता.जि. रत्नागिरी) यांनी गवतनाशक औषध प्राशन केले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि ३ जून रोजी दुपारी १:१५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्र. ४५/२०२५) करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 04-06-2025