CDAC मध्ये 600+ पदांसाठी भव्य भरती : प्रोजेक्ट इंजिनिअर ते मॅनेजरपर्यंत विविध संधी!

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (भारत सरकार) वैज्ञानिक संस्था असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कंप्यूटिंग (C-DAC) ने देशभरातील विविध युनिट्समध्ये ६०० पेक्षा अधिक पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली आहे. प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर, HR असोसिएट यांसारख्या विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया CDAC/JIT/03/2025 – BLR यासह इतर संबंधित जाहिरात क्र. अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आणि प्रशासकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.


एकूण जागा आणि पदांचा तपशील:

सी-डॅकने देशभरातील आपल्या युनिट्समध्ये एकूण ६०० हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये खालील प्रमुख पदांचा समावेश आहे:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोजेक्ट इंजिनिअर168
2प्रोजेक्ट मॅनेजर44
3सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर122
4HR असोसिएट03
5प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)43
6प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव48
7प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर20
8प्रोजेक्ट टेक्निशियन11
9सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीडर53
10प्रोजेक्ट असोसिएट (Experienced)17
11प्रोजेक्ट इंजिनिअर (Experienced)45
12प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher/Experienced)14
13प्रोजेक्ट लीडर05
14प्रोजेक्ट ऑफिसर03
15प्रोजेक्ट ऑफिसर (Canteen)01
16प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (Admin)01
17कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
18प्रोजेक्ट ऑफिसर (PS & O Marketing)02
19प्रोजेक्ट ऑफिसर (Finance & Accounts)01
20प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)41
एकूण600+

युनिटनुसार पदसंख्या:

ही भरती देशभरातील विविध सी-डॅक युनिट्ससाठी आहे:

  • C-DAC – बंगलोर: 126
  • C-DAC -चेन्नई: 87
  • C-DAC -दिल्ली: 24
  • C-DAC -हैदराबाद: 92
  • C-DAC -कोलकाता: 02
  • C-DAC -मोहाली: 09
  • C-DAC – मुंबई: 12
  • C-DAC – नोएडा: 126
  • C-DAC -पुणे: 89
  • C-DAC-पटना: 19
  • C-DAC-तिरुवनंतपुरम: 56 एकूण: 600+

शैक्षणिक पात्रता व अनुभव (पदांनुसार):

  • प्रोजेक्ट इंजिनिअर (पद क्र. 1, 6, 11, 12, 20), सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (पद क्र. 3, 9), प्रोजेक्ट मॅनेजर (पद क्र. 2, 7), प्रोजेक्ट लीडर (पद क्र. 13), प्रोजेक्ट असोसिएट (पद क्र. 5, 10):
    • पात्रता: ६०% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.
    • अनुभव: पद क्र. 1 साठी 0-3 वर्षे, पद क्र. 2 व 7 साठी 09 वर्षे, पद क्र. 3 व 9 साठी 04 वर्षे, पद क्र. 5 साठी अनुभव नाही, पद क्र. 6 साठी 01-04 वर्षे, पद क्र. 10 साठी 01 वर्ष, पद क्र. 11 साठी 01-04 वर्षे, पद क्र. 12 साठी 0-04 वर्षे, पद क्र. 13 साठी 04-07 वर्षे, पद क्र. 20 साठी अनुभव नाही.
  • HR असोसिएट (पद क्र. 4):
    • पात्रता: MBA (HR).
    • अनुभव: 12-14 वर्षे.
  • प्रोजेक्ट टेक्निशियन (पद क्र. 8):
    • पात्रता: ITI+03 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव किंवा B.Sc (Computer Sci / IT /Electronics /Computer Application)+ 01 वर्ष अनुभव.
  • प्रोजेक्ट ऑफिसर (पद क्र. 14, 15, 18, 19):
    • पात्रता: MBA/PG पदवी (Business Management / MA in Mass Communication / Journalism/ Psychology) (पद क्र. 14), हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी (पद क्र. 15), MBA (Marketing) किंवा PG पदवी (Marketing / Business Management) (पद क्र. 18), MBA (Finance) + 02 वर्षे अनुभव / PG पदवी (Finance) + 03 वर्षे अनुभव (पद क्र. 19).
    • अनुभव: पद क्र. 14 व 18 साठी 03 वर्षे, पद क्र. 15 साठी 05-06 वर्षे, पद क्र. 19 साठी 02/03 वर्षे.
  • प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (Admin) (पद क्र. 16):
    • पात्रता: ५०% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
    • अनुभव: 7-10 वर्षे.
  • कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट (पद क्र. 17):
    • पात्रता: पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication).
    • अनुभव: 07 वर्षे.

वयाची अट (दि. २० जून २०२५ रोजी):

  • ३५ वर्षांपर्यंत: प्रोजेक्ट इंजिनिअर (पद क्र. 1).
  • ५६ वर्षांपर्यंत: प्रोजेक्ट मॅनेजर (पद क्र. 2, 7).
  • ४० वर्षांपर्यंत: सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (पद क्र. 3, 9), HR असोसिएट (पद क्र. 4), प्रोजेक्ट लीडर (पद क्र. 13), कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट (पद क्र. 17).
  • ३० वर्षांपर्यंत: प्रोजेक्ट असोसिएट (Fresher) (पद क्र. 5), प्रोजेक्ट टेक्निशियन (पद क्र. 8), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (Admin) (पद क्र. 16), प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher) (पद क्र. 20).
  • ४५ वर्षांपर्यंत: प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव (पद क्र. 6), प्रोजेक्ट असोसिएट (Experienced) (पद क्र. 10), प्रोजेक्ट इंजिनिअर (Experienced) (पद क्र. 11).
  • ३०/४५ वर्षांपर्यंत: प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher/Experienced) (पद क्र. 12).
  • ५० वर्षांपर्यंत: प्रोजेक्ट ऑफिसर (पद क्र. 14, 18, 19), प्रोजेक्ट ऑफिसर (Canteen) (पद क्र. 15).
    • वयात सूट: SC/ST प्रवर्गासाठी ०५ वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी ०३ वर्षे सूट दिली जाईल.

नोकरी ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया:

जाहिरात : https://careers.cdac.in/

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • अर्ज शुल्क: कोणत्याही पदासाठी शुल्क नाही.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० जून २०२५ (सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत).

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी CDAC https://careers.cdac.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार माहिती घ्यावी आणि वेळेत अर्ज सादर करावा.