नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरू होईल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट चालेल.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासही सहमती दर्शविली आहे.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा
रिजिजू म्हणाले की, अधिवेशनादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जाईल. प्रत्येक अधिवेशन विशेष आहे आणि आम्ही ऑपरेशन सिंदूरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करू. सरकारला सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. आम्ही विरोधकांशी याबाबत चर्चा केली, आशा आहे की, या बाबतीत सर्वजण एकसारखी भूमिका घेतील. पावसाळी अधिवेशनात नियमांनुसारच सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन नाही
एकीकडे विरोधक सतत सरकारकडे ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत होते. मंगळवारी १६ विरोधी यासाठी पक्षांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले होते. पण, आता सरकारने पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे. म्हणजेच, विरोधकांच्या सततच्या मागणीनंतरही ऑपरेशन सिंदूरवर कोणतेही विशेष अधिवेशन होणार नाही. जी काही चर्चा होईल, ती सर्व पावसाळी अधिवेशनातच होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 04-06-2025














