गुजरात मध्ये भिंत कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

गांधीनगर : गुजरात मधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. शनिवारी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून मातीचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 12-10-2024