रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, रत्नागिरी हे मौजे गयाळवाडी, रेल्वे स्टेशनजवळ, रत्नागिरी येथील भाडेतत्त्वावरील इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहे. सर्व पात्र व इच्छुक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या योजनेंतर्गत वसतिगृहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल राजेंद्र कुमठेकर यांनी केले आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, रत्नागिरी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
वसतिगृहात इ. ८ वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या आणि स्थानिक नसलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. वसतिगृहात निवास घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, भोजन, गणवेश व इतर शैक्षणिक सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 05/Jun/2025














