11वी प्रवेश प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस; १२.२ लाख अर्ज; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती

मुंबई : अकरावीसाठी ४ जूनपर्यंत १२ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये मुंबई विभागात १ लाख १९ हजार ५९२ जणांची नोंदणी झाली आहे. मुंबईत १,१९,५९२ नोंदणी शिक्षण विभागाची सॉफ्टवेअर प्रणाली सुरळीत होत असली तर काही ठिकाणी अजूनही अडचणींची नोंद झाली आहे.

त्यात मुंबई विभागातील सीबीएसईच्या रिपिटर विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. दरम्यान, आता १७ हजारपैकी फक्त ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती शिक्षण विभाग संचालक श्रीराम पानझडे यांनी दिली. प्रवेश प्रक्रियेचा ५ जूनला शेवटचा दिवस असल्याने तक्रारदार विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

रिपिटर म्हणून पास झालेल्या एसएससी आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना योग्य पर्याय उपलब्ध होत नाही आणि तसेच त्यांच्या मोबाईलवर ओटीपीही येत नाही, अशा तक्रारी आता केल्या जात आहेत. या तक्रारीच्या निवारणासाठी चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारूनही कर्मचाऱ्यांकडे प्रशासकीय अधिकार नसल्याने ती अडचण दूर झालेली नाही.

राज्यातील ९०० तक्रारी प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के तक्रारी सोडविणे हे आमचे काम आहे, ते काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
– श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभाग

  • अर्ज लॉक केलेले ११,२०,३७२
  • नियमित फेरी १०,७३६६
  • इन हाऊस कोटा ५३१६०
  • व्यवस्थापन कोटा २६,५८६
  • अल्पसंख्याक कोटा ४१,०००

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 05-06-2025