राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा कंत्राटी प्राध्यापकांच्या भरतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने तब्बल ९० पेक्षा अधिक कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. विद्यापीठ प्रशासन ९२ नियमित प्राध्यापकांच्या जागा भरण्यात अपयशी ठरल्याने ही वेळ आल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठात पस्तीसहून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यापैकी अनेक विभागांमध्ये सध्या तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक विभागांमध्ये दहा ते पंधरा प्राध्यापक कंत्राटी म्हणून काम करताना दिसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि बॅरि. एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयात सर्वाधिक कंत्राटी प्राध्यापकांचा समावेश असून, इतरही महाविद्यालयांत स्थिती सारखीच आहे.
सत्रांत परीक्षा पद्धतीमुळे दोन सत्रांसाठी प्राध्यापकांना नियुक्त केले जाते आणि त्यांना तासिकेप्रमाणे वेतन दिले जाते. मात्र, तासिका संपताच प्राध्यापक विभाग सोडून निघून जातात, ज्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होतो.
नियमित पदभरती का रखडली?
विद्यापीठामध्ये ९२ प्राध्यापकांची पदे मंजूर झाली होती, परंतु दिवंगत कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या निलंबनामुळे पदभरती रखडली. त्यानंतर एलआयटी विद्यापीठातून वेगळी झाल्याने प्राध्यापक भरतीच्या बिंदुनामावलीचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, वर्षभरापासून नियमित प्राध्यापकांची पदभरती करण्यास विद्यापीठ अकार्यक्षम ठरले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्याची वेळ आली आहे.
नवीन कंत्राटी प्राध्यापकांना मिळणार पूर्णवेळ काम आणि चांगला मोबदला!
या कंत्राटी प्राध्यापकांना पूर्णवेळ काम आणि सहायक प्राध्यापकांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे प्राध्यापकांची विभाग आणि महाविद्यालयाप्रति जबाबदारी निश्चित करण्यात येईल. यासाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नियमानुसार प्रत्येक महिन्याला ४० हजार रुपये वेतन दिले जाणार असल्याची माहिती आहे.
प्रकल्प सहयोगी पदासाठी अर्ज करण्याची संधी!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रकल्प सहयोगी (Project Associate) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
- पदाचे नाव: प्रकल्प सहयोगी
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचणे अनिवार्य आहे.)
- नोकरी ठिकाण: नागपूर
- अर्ज पद्धती: ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
महत्त्वाच्या तारखा आणि तपशील:
- मुलाखतीची तारीख: २५ जून २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ जून २०२५
- ई-मेल पत्ता: saha275@naeruruniversitunic.in
- अर्ज पाठविण्याचा /मुलाखतीचा पत्ता: कार्यालय, भौतिकशास्त्र विभाग, आरटी.एम. नागपूर विद्यापीठ परिसर, नागपूर-४४००३३
- अधिकृत वेबसाईट: https://nagpuruniversity.ac.in/
अर्ज कसा कराल?
या पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता सर्व आवश्यक कागदपत्रांसह २५ जून २०२५ रोजी उपस्थित राहावे.














