इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला!

गेल्या काही दिवसापासून इराण आणि इस्त्रायमध्ये तणाव सुरू झाला आहे.या दरम्यान, आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शनिवारी इराणच्या न्यूक्लिअर साईट्ससह अनेक ऑफिसवर एकाच वेळी सायबर हल्ले झाले.

या सायबर हल्ल्यांमुळे इराण सरकारच्या जवळपास सर्व सेवा विस्कळीत झाल्या आहेत. इराणवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्याच्या दिशेने इस्रायलचे हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

इराणच्या अणु केंद्रांनाही सायबर हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा १ ऑक्टोबर रोजी इस्रायलने प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, आता ही घटना घडली आहे.

इराणच्या सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषदेचे माजी सचिव फिरोजाबादी यांनी जाहीर केले की, न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यासह इराणच्या जवळपास सर्व सरकारी यंत्रणांवर सायबर हल्ले आणि माहिती चोरीचा सामना करावा लागला आहे.

इराणच्या सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषदेचे माजी सचिव फिरोजाबादी म्हणाले, “इराण सरकारच्या जवळपास प्रत्येक क्षेत्राला – न्यायपालिका, कायदेमंडळ आणि कार्यकारी – या सायबर हल्ल्यांमुळे प्रभावित झाले आहे. महत्त्वाची माहितीची मी चोरी झाली आहे.

“आमच्या अणु प्रकल्पांवर तसेच इंधन वितरण, नगरपालिका सेवा, वाहतूक आणि बंदरे यासारख्या गंभीर नेटवर्कवरही सायबर हल्ला झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी दिला होते. ते म्हणाले होते की, बदला “घातक” आणि “आश्चर्यजनक” असेल. उत्तर गाझा नंतर इस्रायलने आता लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या फायटरवर जमिनीवर हल्ला चढवला आहे.

१ ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर इस्रायलने इराणला चोख प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली. इस्रायलने इराणवर थेट हल्ला केल्याने मध्यपूर्वेत महायुद्ध सुरू होऊ शकते, पण मोठी गोष्ट म्हणजे इराणच्या हल्ल्याला इतके दिवस उलटूनही इस्रायल केवळ धमक्या देत आहे . पण इस्त्रायल आणि इराणमधील तणावामुळे पूर्ण जग भयभीत झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 12-10-2024