रत्नागिरी : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारा ३० जून रोजी १३१ वी डाक अदालत दुपारी ४ वा. दुसरा मजला, जी.पी.ओ. इमारत, मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये होणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 PM 05/Jun/2025














