पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मोफत पाठ्यपुस्तके चिपळुणात दाखल

चिपळूण : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके चिपळुणातील कळंबस्ते येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली आहेत. १ जूनपासून या पुस्तकांचे शाळानिहाय वाटप सुरू करण्यात आले असून, ही पुस्तके नवीन शैक्षणिक वर्षात १६ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. या पुस्तकांमध्ये मराठीसह सेमी, संस्कृत तर उर्दू माध्यमाचा समावेश आहे.

नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास काही दिवसांचाच अवधी असल्याने चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मे महिन्यातच मोफत पाठ्यपुस्तकाची शासनाकडून मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार मराठी माध्यमामध्ये पहिलीची १७०८, दुसरीची १७४४, तिसरीची १७२४, चौथीची १८१३, पाचवीची २२४९, सहावीची २००५, सातवीची २१२९, आठवीची २३१८ तर सेमीमध्ये पहिलीची २२२, दुसरीची २७०, तिसरीची २४०, चौथीची २१५, पाचवीची ९५०, सहावीची १०५५, सातवीची ११६४, आठवीची ११२८ याबरोबरच उर्दू माध्यमामध्ये पहिली ते तिसरीची ८८७, चौथीची १२१, पाचवीची १२५, सहावीची ११५, सातवीची १११, आठवीची १२२ तर याच माध्यमाकरिता सेमीसाठी पहिली ते आठवीसाठी २३८, आठवी संस्कृत १०० गुणासाठी २६० तर ५० गुणासाठी ५९० इतकी पुस्तके शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडावीत या दृष्टीने सर्व पुस्तक शाळानिहाय १ जूनपासून वाटप आहे. २०२१ ला चिपळूण शहर आलेल्या महापुरानंतर ही पुस्तके जिल्हा परिषद शाळेत उतरवण्यात सुरुवात केली होती; मात्र तेथं अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होताच यंदा ही पाठ्यपुस्त कळंबस्ते येथील जिल्हा परिषद शाळेत उतरवण्यात आली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 05/Jun/2025