रत्नागिरी : शहरातील धनजीनाका येथे घराच्या छताची दुरुस्ती करत असताना खाली पडलेल्या कामगाराला गंभीर दुखापत झाली. ही घटना बुधवार ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी कामगारावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इपितार अलिमियाँ होडेकर (४९, रा.जुना फणसोप, रत्नागिरी) असे या कामगाराचे नाव आहे. बुधवारी तो धनजीनाका येथील एका घराच्या छताची दुरुस्ती करत होता. सायंकाळी खाली उतरत असताना, पावसाने ओल्या झालेल्या छतावरून त्याचा पाय घसरल्यामुळे तो खाली पडला. यात त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 05/Jun/2025














