Ladki Bahin Yojana: अपात्र बहि‍णींवर कारवाई केली तर, आम्ही न्यायालयात जाऊ – बच्चू कडू

अमरावती : लाडकी बहीण योजनेवर अनेक टीका होताना दिसत आहे. विरोधकांकडून लाडक्या बहि‍णींची फसवणूक होत असल्याचे बोलले जात आहे. लाडकी बहीण योजनेतून आता ५० लाख महिला अपात्र केल्याचा आरोप दिला जात आहे.

त्यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी टीका केली आहे. लाडक्या बहि‍णींची फसवणूक होत आहे आम्ही न्यायालयात जाऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 50 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र केल्याचा आरोप केला जात आहे. ही सगळी लाडक्या बहिणींची फसवणूक आहे. या विरोधात आम्ही कोर्टात पण जाणार आहे. निवडणुकीत पात्र अपात्र न पाहता मतं घेण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. एकदा पात्र-अपात्रची सर्व कारवाई झाली की तेव्हा अपात्र महिलांना सोबत घेऊन आम्ही कोर्टात जाऊ, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 05-06-2025