बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सामाजिक विकास अधिकारी’ पदांच्या २९ जागांसाठी भरती!

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ‘सामाजिक विकास अधिकारी’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २९ पदे भरण्यात येणार आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३० जून २०२५ पूर्वी ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.


पदांचा तपशील:

  • पदाचे नाव: सामाजिक विकास अधिकारी
  • पदसंख्या: २९ जागा
  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य पदव्युत्तर पदवी (MSW)
  • वयोमर्यादा: १८ ते ४३ वर्षे
  • वेतनश्रेणी: रु. ३०,०००/- प्रति महिना
  • नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज प्रक्रिया:

या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने सादर करता येईल.

  • ई-मेल पत्ता (ऑनलाईन अर्ज): dyche01op.swm@mcgm.gov.in
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता (ऑफलाईन अर्ज): उपप्रमुख अभियंता (घ.क.व्य.) प्रचालन यांचे कार्यालय, म्युनिसिपल इमारत ६ वा मजला, पंतनगर वेस्ट डेपोच्या मागे, पंतनगर मनपा यानगृह, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२५

नोकरी बाबत सर्व अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा


अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचनांसाठी बीएमसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात.