साखरपा येथे विद्युत लाईनचा शॉक लागून वृद्ध महिलेचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

साखरपा : सकाळी पहाटे साखरपा जाधववाडी येथे हृदया शांताराम मोरे (70) या घराजवळ असताना महावितरण कंपनीची विद्युत लाईन पडली असल्याने शॉक लागला. यावेळी त्यांचा नातू ओम प्रकाश मोरे याने आपल्या आजीला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता त्याला देखील शॉक लागून तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचे वडील प्रकाश मोरे व गणेश मोरे यांनी दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले. त्यावेळी हृदया मोरे यांना मृत घोषित करण्यात आले. तसेच ओम मोरे याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.

यावेळी प्राथमिक आरोग्य मृताचे नातेवाईक व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी धाव घेतली. यावेळी ही घटना महावितरणच्या गल थान कारभारामुळे ही घटना घडली असल्याचे समोर आल्याने महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी संबंधित वृद्धेच्या कुटुंबियांना शासकीय नुकसान भरपाई, जबाबदार व्यक्तीवर कारवाई, आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी मिळावी अशी मागणी केली आहे. महावितरण अधिकाऱ्यांकडून पुढील घटनेची तपासणी करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी तहसीलदार, महावितरण अभियंता व पोलीस विभागाला या घटने बाबत ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मृत व्यक्तीला ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी व जखमी असणाऱ्या ओम मोरेला तातडीची मदत मिळावी यासाठी महावितरणला आदेश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 05/Jun/2025