रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील कोकणनगर, मजगांव रोड येथून दिनांक ३ जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा अमानत अली मजीद हाज हा घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अमानतला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फसवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमानत अली मजीद हाज हा त्याच्या कपड्यांची बॅग आणि मोबाईल घेऊन घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. कुटुंबीयांनी त्याचा रत्नागिरी शहरभर शोध घेतला, परंतु तो अद्याप मिळून आलेला नाही. अमानत घरी परत न आल्याने, त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असावे, अशी भीती त्याच्या आईने व्यक्त केली आहे.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिनांक ४ जून २०२५ रोजी दुपारी १२.४४ वाजता गुन्हा रजि.नं. २३५/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३७ (२) प्रमाणे करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, अमानतचा शोध घेण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 05-06-2025














