धावत्या रेल्वेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली; खेडजवळ घडला प्रकार

खेड : ३१ मे २०२५ रोजी पहाटे २.४० वाजण्याच्या सुमारास मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१३४) मध्ये दिवाण खवटी रेल्वे स्टेशनजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खिडकीतून खेचून चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कोच नंबर एस-५, सीट नंबर ६८ वरून झोपून प्रवास करत होती. त्यावेळी गाडी दिवाण खवटी रेल्वे स्टेशनच्या अलीकडे थांबली होती. याच संधीचा फायदा घेऊन कोणीतरी अनोळखी व्यक्तीने अंधारात खिडकीतून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला.

चोरट्याने १९,००० रुपये किमतीची, ६ ग्रॅम १७० मिली ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली आहे. या घटनेची फिर्याद संबंधित महिलेने दिली असून, ठाणे पोलीस ठाणे, मुंबई रेल्वे येथून ऑनलाईन गुन्हा खेड पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर ४ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०४ (२) प्रमाणे गुन्हा रजि. नं. १८६/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:12 05-06-2025