परटवणे ते बसणी मार्गावरील धोकादायक झाडे तत्काळ तोडा : संदेश बनप

रत्नागिरी : परटवणे ते बसणी नागझरी मार्गावर अनेक झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत. विशेष करून काळबादेवी नवानगर येथे वडाचे झाड कोणत्याही क्षणी कोसळेल अशा अवस्थेत आहे. ही झाडे तत्काळ तोडून टाकावी अशी मागणी काळबादेवी शिवसेना शाखाप्रमुख संदेश बनप यांनी केली आहे.

परटवणे ते बसणी नागझरी रोड दुतर्फा झाडे आहेत. मे महिन्यात झालेल्या वादळी पावसामध्ये शिरगाव गांजुर्डा स्टॉप, शिरगांव दर्गा आणि सोनारवाडी येथे रस्त्यावर मोठी झाडे पडली. त्यामध्ये गांजूडा स्टॉप येथे पडलेले झाड विजेच्या तारावर पडले. त्यामुळे साधारण 3 विजेचे खांब देखील रोडवर पडले. पाऊस असल्यामुळे रहदारी नव्हती. त्यामुळे कोणतीही जिवीतहानी किंवा कोणताही मोठा अपघात झाला नाही. मात्र या दुर्घटनेमुळे अनेक तास वाहनकोंडीची समस्या निर्माण झाली होती.

याच मार्गावर अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत उभे आहेत. काळबादेवी नवानगर येथे एक भले मोठे वडाचे झाड रोड वर पडण्याच्या स्थितीत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर संबंधित विभागाला सूचना करुन परटवणे ते बसणी नागझरी रोडवरील धोकादायक झाडाची पाहणी करुन ते तोडण्याची सूचना द्यावी ही विनंती अशी मागणी संदेश बनप यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 05-06-2025