चिपळूण : चिपळूण शहर व खेर्डी ग्रामपंचायत परिसरामध्ये आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीतील अनुदानातून विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. १४ रोजी करण्यात आले आहे. चिपळूण नगर परिषद व खेर्डी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित विकासकामांची भूमिपूजने सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत होणार आहेत. खेर्डी येथील विकासकामांचे भूमिपूजन सायंकाळी ५ वा. करण्यात येणार आहे.
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नातून २०२२-२३ या आर्थिक वर्षात शहरासाठी ३.६० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या अंतर्गत शहरातील मीनाताई ठाकरे उद्यान, नारायण तलाव उद्यान, विरेश्वर तलाव उद्यान, पाग लेनवाडी, खंड स्वरविहार संकूल, उक्ताड खेळाचे मैदान, गोवळकोट खेळाचे मैदान, पेठमाप मराठी शाळा, बापट आळी कन्या शाळा, काविळतळी, शंकरवाडी आदी ठिकाणी ओपन जीम साहित्य बसविण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
तसेच चिपळूण मुस्लिम समाज कम्युनिटी सेंटरजवळ संरक्षक भिंत बांधणे, गोवळकोट रोड मरकज कब्रस्तान, दादर मोहल्ला कब्रस्तान परिसर सुशोभित करणे, काविळतळी येथील आरक्षण क्र. १४४ येथे फुलपाखरू उद्यान विकसीत करणे व अन्य उद्यान विकसित करणे, रामतीर्थ तलावाजवळील जलतरण तलावाचे नूतनीकरण, नवीन वसाहत नारायण कदम यांच्या घराच्या मागील बगिचा विकसीत करणे आदी शहरातील विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे.
सायंकाळी ५ वा. खेर्डी ग्रामपंचायत हद्दीतील जागुष्टे सॉ मील ते शिगवणवाडी, वरदविनायक रहिवास निवासी संकुल, औद्योगिक वसाहत ते शिगवणवाडी, जाबरे घर विठ्ठलवाडी ते गुरूनाथ खताते घर, बाजारपेठ मिरगल चाळ, मंगेश यादव ते रघुनाथ दाभोळकर, विकासवाडी वाचनालय परिसर आदी ठिकाणी रस्ता डांबरीकरण, मजबुतीकरण, चौक सुशोभिकरण, भुयारी गटार, संरक्षक भिंत तसेच अनिल दाभोळकर दुकान ते सावंत घर इथपर्यंत नदीला संरक्षक भिंत बांधणे, भुरणवाडी येथे समाजमंदिर भूमीपूजन, औद्योगिक वसाहत गणेश घाट बांधणे भूमिपूजन आदी विकासकामांचे भूमिपूजन आ. निकम यांच्या हस्ते होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 14/Oct/2024