रत्नागिरी : ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर-जिल्ह्यातील विविध ईदगाह, मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. मैदान, मस्जिदमधील साफसफाई, रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, ७ जून रोजी ईद-उल-अजहा सण साजरे होणार आहे. सणासाठी अवका एकच दिवस शिल्लक असल्यामुळे सणाची तयारी मुस्लिम बांधव करत आहेत.
ईदनिमित्त रत्नागिरी शहरातील कोकण नगर येथील जामा मस्जिद येथे सकाळी ७.३० वाजता नमाज अदा केली जाणार आहे. तसेच राज नगर, उद्यम नगर, बाजारपेठ रत्नागिरी, मिरकरवाडा एक, दोन यासह विविध तालुक्याच्या ठिकाणी ईदगाह मैदान व मस्जिदमध्ये नमाज अदा केली जाणार आहे.
इस्लाम धर्माचा पवित्र सण ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद ७ जून रोजी देशासह जगभरात साजरी होणार आहे. त्यानिमित्त रत्नगिरी शहर, जिल्ह्यातील विविध ईदगाह, मस्जिद, दर्गा परिसरात नमाज पठण करण्यासाठी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे.
कोकणनगर, राज नगर, उद्यम नगर, बाजारपेठ रत्नागिरी, मिरकरवाडा, मजगाव, कोतवडे, पावस, भाट्ये, पावस यासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही ईदची नमाज होणार आहे. त्यामुळे मस्जिद, ईदगाह परिसराची स्वच्छता, रंगरंगोटीचे काम सुरू आहे.
कुर्बानीसाठीच्या बोकड खरेदीसाठी झुंबड
ईद-उल-अजहा या सणानिमित्त मुस्लिम बांधव बोकडाची कुर्बानी देत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बोकडांची उलाढाल होत असते. रत्नागिरी शहरात चंपक मैदान येथे बाजार भरले आहे. ३० हजार ते तब्बल १ लाखांपर्यंत बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राजस्थान, कराड, सातारा, कोल्हापूर, मिरज याचबरोबर इतर जिल्ह्यातून बोकड विकण्यासाठी व्यापारी आले आहेत. बोकड खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची चंपक मैदानात मोठी गर्दी होत आहे.
याठिकाणी होणार नमाज
कोकण नगर जामा मस्जिद – सकाळी ७.३०, मुफ्ती तौफिक सारंग
राजनगर – सकाळी ७.३०- हानीफ नुरूल्लाह
उद्यम नगर- सकाळी ७.३०- मुफ्ती रिजवान
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 06/Jun/2025














