रत्नागिरी : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या आवाहनानुसार, तसेच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष श्री. प्रतिक देसाई, महिला मोर्चा आघाडी प्रदेश सचिव सौ. शिल्पाताई मराठे आणि महिला मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. वर्षाताई ढेकणे यांच्या वाढदिवसानिमित्त व मार्गदर्शनातून गुरुवार, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मध्य मंडल, रत्नागिरी भाजपा (द) मधील महिला मोर्चा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनुश्री आपटे आणि कुवारबाव पंचायत समितीमधील भाजपा कार्यकर्त्यांनी कुवारबाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ०४ येथे वृक्षारोपण केले. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत, प्लास्टिक प्रदूषण संपवू या जागतिक पर्यावरण दिनाच्या यंदाच्या थीमशी सुसंगत असे हे कार्य होते.
यावेळी कुवारबाव भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या उपक्रमातून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 06-06-2025














