रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू किंवा अवयव निकामी झाल्यास सानुग्रह अनुदान देण्यात येते. २०२४-२५ या वर्षात ६१ लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. अद्याप ६२ लाभार्थ्यांचे एक कोटी २४ लाख रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे.
शासनातर्फे महत्त्वाकांक्षी योजन राबवण्यात येत असून, अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये अनुदान लाभार्थी वारसदारांच्या बँकखात्यावर थेट जमा होते.
शासनाकडून अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी राबवण्यात येणारी योजना उपयुक्त ठरत आहे. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा दोन अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात येते.
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत ६१ प्रस्ताव मंजूर होऊन लाभार्थी कुटुंबीयांच्या खात्यावर १ कोटी २१ लाख रुपये शासनाकडून जमा करण्यात आले आहेत. २०२४-२५ मधील अद्याप ६२ लाभार्थ्यांचे १ कोटी २४ लाख रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे; मात्र ते लवकरच शासनाकडून जमा केले जाणार असल्याचे संकेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 06/Jun/2025









