Shiv Rajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर मोठी गर्दी!

आजचा दिवस शिवभक्तांसाठी खास आहे. आज अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी पार पडला होता. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे.

जगदीश्वर मंदिरातून आता छत्रपती शिवाजी राजेंची पालखी राजसद्रेवर पोहचेल. यासाठी होळीचामाळ, बाजारपेठ, राजसदर परिसरात मोठी गर्दी उसळली आहे.

पालखीला सुरक्षा म्हणून शिवभक्तांनी राजसद्रेवर जाणाऱ्या रस्त्याला वेढा घातला आहे. जेणेकरून राजेंची पालखी सुखरूप पोहचेल

युवराज शहाजी राजे आता राजेशाही पोशाखात रोपवे परिसरातून पायरी मार्गे राजसद्रेवर निघाले आहेत. उसळलेली गर्दी राजसदरकडे जाणाऱ्या मार्गावर निघाली आहे.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजांना मुजरा करण्यासाठी किल्ले रायगडावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे,

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर जवळपास 3-4 लाख शिवभक्त दाखल झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 06-06-2025